breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

साळेकर परिवार आणि रास ग्रुप कंपनी यांच्यातर्फे आषाढी वारी मध्ये वस्तू आणि औषध रूपी सेवा

पुणे : आषाढी एकादशी २०२३ निमित्ताने साळेकर परिवार आणि रास ग्रुप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कै. पंडित लक्ष्मण साळेकर आणि कै. मारुती लक्ष्मण साळेकर यांच्या स्मरणार्थ विठ्ठल लक्ष्मण साळेकर यांच्या शुभ हस्ते रायरेश्वर हून येणाऱ्या जेधे महाराजांच्या दिंडी मध्ये उपस्थित सर्व वारकरी यांना रेनकोट वाटप करण्यात आले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर येथे भारत सेवाश्रम संघ यांच्या तर्फे मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय शिबिरात लागणारी औषध उपलब्ध करून देण्यात आली. या कामी रास ग्रुप कंपनीच्या रुपाली रमेश साळेकर, गणेश विट्ठल साळेकर, डॉ. संदीप सोपान साळेकर, डॉ. कल्याणी संदीप साळेकर, डॉ. धनंजय शिवाजी मोरे सर, डॉ. अभिषेक साकरकर सर, डॉ. प्रमोद अमरुळे सर, डॉ. देव चव्हाण सर (धुळे), डॉ. सूजय पाटील, अंश संतोष पारठे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

हेही वाचा – ‘देशात पेट्रोलचे दर १५ रूपये प्रतिलीटर होऊ शकतात’; नितीन गडकरींचा मोठा दावा

डॉ. प्रमोद आमरुळेसर आणि सर्व डॉक्टर टीम ने पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा वारकऱ्यांची व्हावी अशी पांडुरंग चरणी प्रार्थना केली.वारकरी बांधवांची सेवा करण्यासाठी पुढील वर्षीचे नियोजन अजून मोठे करणार असल्याचे रास ग्रुपचे रमेशजी साळेकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button