breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील 26 जणांना करोनाची लागण

करोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात नवी आव्हानं उभी राहत आहेत.अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे… कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील २६ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दक्षिण दिल्लीतील जहाँगीरपुरी परिसरात हे करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.

दिल्लीत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण दिल्लीत ७६ कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील दक्षिण दिल्लीतील सी ब्लॉकमध्ये असलेल्या जहाँगीरपुरीतही कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच कुटुंबातील २६ जणांना करोनाची लागण झाली आहे.

‘काही कंटेनमेंट झोनमध्ये लोक रस्त्यावर फिरत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर घराबाहेर न पडण्याची सूचना केलेली असताना शेजाऱ्यांच्या घरीही लोक जात आहेत. त्यात जहाँगीरपुरी झोनमध्ये २६ जणांना करोना झाल्याचं चाचणीतून निष्पन्न झालं आहे. हे सर्व बाधित एकाच कुटुंबातील असून याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्यानंतरही हे लोक एकमेकांच्या घरी गेल्यानं करोनाचा संसर्ग झाला आहे,’ असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

दिल्लीत आरोग्य विभागानं सामूदायिक तपासणी सुरू केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या नागरिकांच्या तपासण्या सध्या करण्यात येत आहेत. जहाँगीरपुरी कंटेनमेंट झोनमधील ६० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात ३१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र, आरोग्य विभागाला धक्का तेव्हा बसला जेव्हा ३१ पैकी २६ जण एकाच कुटुंबातील निघाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button