breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हॉकर्स पुनर्वसनाचे नियोजन आणि नवीन हॉकर्सचे सर्वेक्षण लवकरच – आयुक्त श्रावण हार्डीकर

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील हॉकर्सचे ३ वर्षात पद्धतशीरपणे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. हॉकर्सचे सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची निविदा प्रक्रियेद्वारे नेमणूक करण्यात येणार असून त्यानंतर एक महिन्यात हॉकर्सचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितली.

  • शहर फेरीवाला समितीची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनात झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, विजय खोराटे, मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, स्मिता झगडे, श्रीनिवास दांगट, आशा राऊत, फेरीवाला समितीचे सदस्य काशिनाथ नखाते, विजय शहापूरकर, मनिषा राऊत, डॉ. सरोज आंबिके, राजेंद्र वाघचौरे, प्रविण कांबळे, कविता खराडे, दामोदर मांजरे, बाबासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन (NULM) अंतर्गत हॉकर्सना कौशल्य प्रशिक्षण व त्यामाध्यमातून अर्थसाह्य्य देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले. मंजूर हॉकर्स झोनवर अंमलबजावणीबाबत कार्यवाही करण्यात यावी व हॉकर्सच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

  • हॉकर्सचे सर्वेक्षण सकाळी, दुपारी व संध्याकाळी अशा दिवसातून तीन वेळेत करण्याचे नियोजन असून त्यासाठी संस्था नेमणूकीची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. हॉकर्स झोन निर्मितीसाठी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button