breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील

मुंबई |

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरात शिवसेनेकडून नाराणय राणेंचा निषेध करण्याची तयारी सुरु असून पुणे, नाशिक आणि महाडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील नारायण राणेंवर टीका केली असून त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे असं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“मला वाटतं नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री…ज्यांनी ही पदं भोगली आहेत, या पदाची गरिमा त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. जर ते नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे आणि वेळ आली तर शॉकदेखील दिला पाहिजे,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. “नाराय़ण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी असतानाही राज्यात विरोधी पक्षनेते होते. पण त्यांची एक गरिमा होती. पण सध्या गरिमा नसलेलं भूत आलं आहे. यांच्या अंगात भूत घुसलं आहे का असं वाटतं. त्यांना भानूमतीच्या एखाद्या भक्ताकडे नेऊन अंगात काय घुसलं आहे पाहिलं पाहिजे,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी ते माफी मागण्याच्याही लायकीचे नाहीत असं म्हटलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button