breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ट्रम्प यांचा कुटुंबासह खंदकात आश्रय

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन अमेरिकी व्यक्तीचा पोलीस अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर उसळलेले हिंसक आंदोलन आता अनेक शहरांत पसरले असून ४०  शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लागोपाठ सहाव्या दिवशी आंदोलनाचा भडका सुरूच राहिला. यात किमान पाच लोकांचा मृत्यू झाला असून  अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमधील खंदकात आश्रय घेण्याची वेळ आली.

अमेरिकेतील गेल्या दहा वर्षांतील हे सर्वात मोठे नागरी आंदोलन असून किमान १४० शहरांत ते पसरले आहे. सीएनएनच्या मते ट्रम्प यांना काही काळ व्हाइट हाऊसमधील खंदकात नेण्यात आले. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प व मुलगा बॅरन यांनाही खंदकात बसवण्यात आले. अध्यक्ष ट्रम्प हे रविवारी सार्वजनिक पातळीवर दिसले नाहीत. पण त्यांनी अनेक ट्विट संदेश पाठवून माध्यमेच देशात अराजक माजवित असल्याचा आरोप केला आहे.

४५ वर्षीय फ्लॉइड याचा पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर गुडघा दाबून धरल्याने गुदमरून मृत्यू झाला होता. मिनियापोलिस येथे सोमवारी श्वेतवर्णीय पोलिस अधिकाऱ्याने हे कृत्य केले होते. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून वीस राज्यात नॅशनल गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २५६४ लोकांना अटक केली आहे. मिनेसोटा येथील मिनियापोलिस भागात सुरुवातीला आंदोलन सुरू झाले त्यानंतर लॉसएंजेलिस, शिकागो, न्यूयॉर्क, ह्य़ूस्टन, फिलाडेल्पिया व वॉशिंग्टन डीसी येथे हे आंदोलन पसरले आहे. व्हाइट हाऊसजवळ अश्रुधुराचा मारा करण्यात आला. निदर्शकांनी  इमारतींच्या काचा फोडल्या, मोटारी पेटवल्या. वॉशिंग्टन स्मारक त्यामुळे धुरात लुप्त झाले. व्हाइट हाऊसभोवती अनेक लोक ट्रम्प यांच्या विरोधात घोषणा देत जमले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button