TOP NewsUncategorizedपुणे

पुणे ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढणार, मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

पुणे ग्रामपंचायत निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित करणार असल्याचे समजते. ते दोन दिवस पुण्यात मुक्काम करणार आहेत. मनसेकडून पुण्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तालुका पातळीवर मनसे नेत्यांच्या आढावा बैठका सुरु आहेत.

आतापर्यंत इंदापूर, दौंड, मुळशी, शिरूर तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. या सगळ्याचा अहवाल आता राज ठाकरे यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनसेकडून ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे निवडणूक लढवल्याने महाविकासआघाडीला फायदा झाला होता. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होणार का, हे पाहावे लागेल.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे ‘मनसे’कडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. जिकडे पॅनलमध्ये संधी मिळणार नाही तिकडे मनसे स्वतःचा पॅनल तयार करेल. येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button