पिंपरी / चिंचवड

काचेच्या बाटलीने एकाचा खून, एकावर खुनी हल्ला करून आरोपी पसार

पिंपरी l प्रतिनिधी

जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाचा काचेच्या बाटलीने मारून खून केला. त्यानंतर खून झालेल्या तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या एका तरुणावर देखील आरोपींनी काचेच्या बाटलीने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी तीन वाजता धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.

आसिफ सय्यद (वय 24, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर स्वराज गवारगुर (वय 21) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल संतोष गायकवाड (वय 21, रा. महात्माफुले नगर, एमआयडीसी भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी विशाल उर्फ जीवन कवळकार (वय 28, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), कृष्णा मोरे उर्फ एम के (वय 30, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यामुळे ते त्यांचा मित्र मयत आसिफ सय्यद याच्या सोबत धावडेवस्ती येथील सम्राट हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी आले. जेवण केल्यानंतर फिर्यादी आणि त्यांचा मित्र हॉटेलच्या बाहेर आले. आरोपी विशाल आणि आसिफ याचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून शाब्दिक भांडण झाले होते. त्या रागातून आरोपीने आसिफ याला ठार मारण्याच्या उद्देशाने कृष्णा याच्यासोबत काचेच्या फुटलेल्या बाटलीने मानेवर मारून त्याचा खून केला.

हे भांडण सोडविण्यासाठी आसिफ याचा मित्र स्वराज आला. त्याला देखील आरोपींनी फुटलेल्या काचेच्या बाटलीने मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button