ताज्या घडामोडीमुंबई

अमेरिकेहून हवेने पोट भरणारी मशीन मागवा; महागाईवरुन जितेंद्र आव्हाडांचा; केंद्र सरकारला टोला

अंबरनाथ |  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वाढत्या महागाईवरून बोलताना केंद्र सरकारला उपरोधिक टोला लगावला आहे. अमेरिकेने हवेतून पोट भरणारी मशीन शोधली असून ही मशीन लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली, तरी काळजी करू नका, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय आहे.

पेट्रोल डिझेलची सातत्याने दररोज होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर ही गगनाला भिडलेत. महागाईच्या या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळून निघाला आहे. विरोधकांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. वाढत्या महागाईवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अंबरनाथ मधील बोहोनोली गावात बैलगाडा शर्यतींना आलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत केंद्र सरकारला उपरोधिक टोला लगावला. अमेरिकेत सध्या हवेतून पोट भरणारी मशिन विकसित करण्यात आली आहे. लवकरच ही मशीन महाराष्ट्रात आणि भारतातही लॉन्च होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली, पेट्रोल अगदी अडीचशे-तीनशे रुपये लिटर जरी झालं, तरी यापुढे काळजी करू नका, हवेतून पोट भरणारी मशीन मागवा आणि निश्चिंत व्हा, असा उपरोधिक टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

सद्य परिस्थितीमध्ये पेट्रोल- डिझल आणि दैनंदिनदिन घरगुती सामानाचे दर देखील गगनाला भिडले आहेत. एकीकडे राज्यात उष्णतेची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे महागाईची लाट उसळली असल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच महागाईच्या लाटेत होरपळून निघत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button