breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस धार्जिण्या ठेकेदारांना महापालिका आयुक्तांकडून “पायघड्या”

  • भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांचा आरोप; वादग्रस्त ठेकेदाराला एक कोटीच्या कामाची बक्षिसी
  • गॅस पुरवठादार ठेकेदाराची विभागीय आयुक्तांकडून चौकशी सुरू असताना मुदतवाढ

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार म्हणजे अक्षरशः “आंधळे दळते आणि कुत्र पिठ खाते” अशी अवस्था आहे. याचा प्रत्यय नुकताच आला. गॅस पुरवठा करणाऱ्या ठेकेदार कंपनीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू असताना बिनबोभाटपणे “गॅब” या संस्थेला मुदतवाढ देऊन तब्बल एक कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. याबाबतच्या निर्णयाला बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, ही ठेकेदार कंपनी राष्ट्रवादीचे माजी महापौरांच्या मर्जीतली असून यानिमित्ताने महापालिका आयुक्त राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस धार्जिण्या ठेकेदारांना पायघड्या घालत आहेत का? असा प्रश्न भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अख्यारीत असणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय तसेच कोरोना कालावधीमध्ये महापालिकेने सुरू केलेल्या हॉस्पिटलमध्ये मे. गॅब एन्टरप्रायजेस ही संस्था वैद्यकीय ऑक्सिजन गॅस पुरवठा करते. दरम्यान काही महिन्यापूर्वी पालिकेच्या ‘वायसीएम’ हॉस्पिटलमध्ये गॅस गळती झाली. या वेळ कोणती मोठी दुर्घटना झाली नसली, तरी संबंधित गॅस कंपनी व गॅस यंत्रणा याबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर नगरसेवक तुषार कामठे यांनी सर्वसाधारण सभेत या कंपनीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी अनेक धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या अनेक वर्षापासून एकच एक कंपनी महापालिकेला ऑक्सीजन गॅस पुरवठा करीत आहेत. या कंपनीच्या दराबाबत ही मोठी शंका उपस्थित करण्यात आली. एकच कंपनीला वारंवार कोणतीही निविदा प्रक्रिया राबवता काम देण्यात आले आहे. त्यामुळे या ठेकेदार कंपनीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या (दि.4) स्थायी समितीच्या सभेत मे. गॅब एन्टरप्रायजेस या संस्थेला पायघड्या घालण्यात आल्याचे दिसून आले. “पीएमआरडीए’ च्या माध्यमातून पिंपरीतील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जम्बो कोविड केअर सेंटर उभारले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे त्याचे संचलन केले जाते. जम्बो कोविड रुग्णालयाकरिता आवश्यक वैद्यकीय ऑक्सीजन (ओटू ) द्रव गॅस पुरवठा करण्याचे काम मे. गॅब एन्टरप्रायजेस या संस्थेला दिले होते. या संस्थेची 31 मे 2021 रोजी मुदत संपुष्टात आली.

कोरोना रुग्णांकरिता द्रव ऑक्सीजन गॅसची आवश्यकता असल्याने व निविदा प्रक्रीयेस लागणारा कालावधी विचारात घेता या संस्थेस नवीन निविदा प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. तसेच कोरोना निधी या लेखाशिर्षामधून जम्बो कोविड रुग्णालयास द्रव ऑक्सीजन गॅसच्या पुरवठ्याकामी मुदतवाढ कालावधीकरीता 1 कोटीच्या खर्चास स्थायी समिती सभेत सदस्य पारित प्रस्तावाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

पुरावे देऊनसुद्धा आयुक्तांचे राष्ट्रवादीशी संबंधित ठेकेदारांना ‘क्लीन चिट’
स्थायी समिती सभेत सदस्य पारित ठरावाला सत्ताधारी भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी विरोध केला आहे. कामठे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस धार्जिण्या ठेकेदायाराला अभय दिले जाते. ही संस्था माजी महापौरांच्या मर्जीतली आहे. गेली अनेक वर्ष या संस्थेने गॅस पुरवठ्याच्या कामातून महापालिकेला अक्षरशः लुटले आहे आहे. हे सर्वसाधारण सभेत मी पुराव्यानिशी सिद्ध देखील केले या ठेकेदार कंपनीची सध्या चौकशी सुरू आहे, असे असताना मुदतवाढ आणि सोबत एक कोटीच्या कामांची बक्षिसे कोणाच्या सांगण्यावरून दिली जात आहे हे उघड गुपित आहे. महापालिकेतील काही अधिकारी राष्ट्रवादी धार्जिन ठेकेदाराला पोसण्याचे काम करीत असताना आयुक्त राजेश पाटील देखील अशा कामांना एक प्रकारे पाठिंबा देत असल्याचे या प्रकारावरून उघड होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button