Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात ‘अवकाळी’चे संकट ! हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी

मुंबई : राज्यात ऊन तापत असताना बेमोसमी पावसाचे संकट आहे. राज्यात वादळी वा-यासह मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे शेतक-यांसमोर संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागात ४० कि.मी. ताशी वेगाने वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे कोकणात मासेमारी करणा-यांच्या अडीच हजार बोटी किना-यावर आल्या आहेत.

उत्तरेकडून येणा-या वा-यामुळे देशातील हवामानात सतत बदल होत आहेत. महाराष्ट्रात दिवसा ऊन तापत आहे तर संध्याकाळी थंड वारे वाहत आहेत. दक्षिणेकडून येणा-या वा-याचा वेग वाढला आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळी वा-यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडचे महत्त्वाचे प्रश्न अधिवेशनात मार्गी; आमदार शंकर जगताप यांची अधिवेशनातील प्रभावी कामगिरी

हवामान विभागाने वादळी वा-यासह पावसाचा इशारा दिल्यामुळे रत्नागिरीत शेकडो मच्छिमारी बोटी किना-याला आल्या आहेत. दोन दिवस वादळी वा-यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या वा-याचा खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मच्छिमारी बोटी बंदरात उभ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार मच्छिमारी बोटी आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान आहे. मासेमारी ठप्प झाल्याने बाजारपेठेवरती परिणाम झाला आहे. मच्छीवर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. सुरमई मासे ९०० रुपये किलो झाले आहेत. मिरकरवाडा, जयगड, साखरी नाटे, हर्णे, पूर्णगड, गुहागर, देवगड, मालवण बंदरात मच्छिमारी बोटी किना-यालाच आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button