Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

‘मद्यपान करून कुटुंबाला शिवीगाळ’; नीरज चोप्राचे प्रशिक्षक नवल सिंग यांच्यावर गंभीर आरोप

Neeraj Chopra and Sumit Antil | भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा सध्या आपल्या कामगिरीपेक्षा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नीरजने भालाफेक प्रशिक्षक नवल सिंग यांच्यावर मद्यपान करून खेळाडूंना शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांना पॅरालिम्पिक पदकविजेता सुमित अंतिल यांनीही पाठिंबा दिला आहे.

द ब्रिजच्या वृत्तानुसार, नीरज चोप्रा आणि सुमित अंतिलसह अन्य काही खेळाडूंनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला (SAI) पत्र लिहिलं आहे. नवल सिंग यांनी अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. सुमितने आपल्या पत्रात लिहिले की, “मी याआधी कुठल्याही वादात अडकलेलो नाही. मला कोणत्याही वादात पडायची इच्छा नाही. मी प्रशिक्षकांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. स्पर्धा सुरु असताना, प्रशिक्षक मद्यपान करुन रेकॉर्डिंग पाठवतात. ज्यामध्ये खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबांना शिवीगाळ केली जाते. यामध्ये आई- बहिणींच्या सन्मानालाही ठेस पोहोचवली जाते.”

हेही वाचा     :                  ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये दणक्यात ‘प्रमोशन’  

सुमित अंतिलला ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नीरज चोप्राने देखील साथ दिली आहे. नीरजने SAI ला इमेल केला आहे. या इमेल द्वारे त्याने कारवाईची मागणी केली आहे. नीरजने लिहिले की, “एक खेळाडू म्हणून मी सांगू इच्छितो की, खेळामध्ये शिस्त, आदर आणि प्रतिष्ठा असणं खूप गरजेचं आहे. प्रशिक्षक नवल सिंग यांनी केलेलं विधान केवळ चुकीचं नाही, तर अत्यंत लाजीरवाणं आहे. मी सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभा आहे.” भालाफेकपटूंनी SAI कडे तक्रार केली असून ऑडियो रेकॉर्डिंग देखील पाठवले आहेत. ज्यात नवल सिंग नीरज चोप्रा, सुमित अंतिल, नवदीप सिंग आणि पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमला शिवीगाळ करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button