Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी होणार; मिसिंग लिंकचे ९३% काम पूर्ण..वाचा सविस्तर

पुणे :  पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरच्या पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. आतापर्यत मिसिंग लिकचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मिसिंग लिंकचे काम येत्या मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने ठेवले आहे.

त्यानुसार काम सुरू असून, मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून, 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.मुंबई व पुणे ही दोन्ही शहरांमधील अंतर कमी करून प्रवासाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे पुणे-मुंबईला प्रवास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात.

हेही वाचा –  बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

अडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसींग लिंकचे काम 2019 मध्ये एमएसआरडीसीने हाती घेतले.

या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होत आहे. येथे देशातील सर्वाधिक सुमारे 181 मीटर उंचीचा दरीपूल उभारला आहे. त्या पुलाचा एक भाग तयार झाला असून, उर्वरित पुलाचा दुसरा मार्ग एकमेकांना जोडण्याचे; तसेच केबल लावण्याचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button