ताज्या घडामोडीमुंबई

पाकिस्तानकडून भारताच्या चार राज्यांतील २० शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न

पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर ड्रोन हल्ला

मुंबई : पाकिस्तानच्या कुरापती सातत्याने सुरु आहेत. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारताच्या चार राज्यांमधील २० शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमधील शहरांचा समावेश आहे. तसेच सध्या पाकिस्तानकडून सीमा भागात सातत्याने गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यात श्रीनगर विमानतळ, बडगाम, गांदरबल, अवंतीपोरा यांसारख्या काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी या सर्व प्रयत्नांना हाणून पाडले.

चार राज्यांमधील २० शहरांना भारताकडून टार्गेट
जम्मू
सांबा
उरी
पुंछ
पठाणकोट
बारामुल्ला
कुपवाडा
राजौरी
अवंतीपुरा
नौशेरा
अखनूर
तंगधार
जैसलमेर
उत्तरलाई
फलौदी
अमृतसह
फिरोजपूर
बाढमेर

हेही वाचा –  ATM बाबत सरकारकडून बँकांना महत्त्वाचे निर्देश; सायबर अटॅक रोखण्यासाठीही केल्या महत्त्वाच्या सूचना

पाकिस्तानकडून पुन्हा काश्मीरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काश्मीरमधील श्रीनगर विमानतळ, बडगाम, गांदरबल, अवंतीपोरा यासह काश्मीर खोऱ्यातील विविध भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय सेनेकडून हे सर्व ड्रोन नष्ट करण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही.

तर दुसरीकडे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत अनेक विशेष बैठका सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्यातील बैठक नुकतीच संपली आहे. डोभाल यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे देखील पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडले. ही बैठक सुमारे दीड तास चालली.

तर दुसरीकडे श्रीनगर विमानतळाच्या आसपास स्थानिक नागरिकांनी स्फोटांचे आवाज आल्याची माहिती समोर येत आहे. पण हा ड्रोन हल्ला होता. जो भारतीय सैन्याकडून यशस्वीरित्या उधळण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा येथे सुरक्षा दलांनी एका ड्रोनला मार गिराले आहे. सध्या काश्मीर खोऱ्यात पूर्णपणे ब्लॅकआऊट आहे. पाकिस्तानच्या श्रीनगर विमानतळावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button