Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई लोकल की बार? धावत्या ट्रेनमध्ये तरुणांची मद्यपार्टी, व्हिडिओ व्हायरल..

Mumbai Local Train | मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असताना, दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेला हरताळ फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई लोकलच्या धावत्या गाडीत चक्क दरवाज्याजवळ बसून काही तरुण बिनधास्तपणे मद्यसेवन (दारू पिणे) करत असल्याची एक चित्रफीत (व्हिडिओ) समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे रेल्वेतील प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नुकताच समाजमाध्यमांवर एका प्रवाशाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण धावत्या लोकलच्या दरवाज्यात पाय सोडून अगदी आरामात बसल्याचे दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे तरुण केवळ मद्यसेवनच करत नसून, त्यांनी सोबतीला खाद्यपदार्थांची प्लेट (चखणा) ठेवून त्याचाही आस्वाद घेतल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. रविवारी मुंबईहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा

हिंजवडीत भरधाव दुचाकीचा भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahaenews (@mahaenews)

महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासनावर थेट सवाल

मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत लोकल गाड्यांची संख्या कमी असल्याने अनेकांना आधीच कसरत करत प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासन प्रवास सुखकर करण्यासाठी मार्गिका वाढवण्याचे प्रयत्न करत असताना, काही प्रवासी मात्र अशा प्रकारे नियमांची पायमल्ली करत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

धावत्या लोकलमध्ये अशा प्रकारे कोणतीही भीती न बाळगता मद्यपार्टी सुरू असल्याने इतर सहप्रवाशांमध्ये, विशेषतः महिला प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “लोकलमध्ये रेल्वे पोलीस आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? अशा हुल्लडबाजांवर रेल्वे पोलीस तात्काळ कारवाई का करत नाहीत?” असा संतप्त सवाल आता सामान्य प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर आता रेल्वे पोलीस प्रशासन या तरुणांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button