Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत विरुद्ध इंग्लंडमधील तिसरा सामना आज..! कोण बाजी मारणार?

IND vs ENG | भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आता मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२८ जानेवारी) राजकोटमधील निरंजन शाह मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता राजकोटमध्ये खेळला जाईल. सामन्याचा टाॅस (नाणेफेक) संध्याकाळी ६.३० वाजता होईल. सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होईल, तर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टारवर होईल.

हेही वाचा  :  येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता..! 

तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. अष्टपैलू हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाऊ शकते, कारण हार्दिकला एकदिवसीय सामने आणि नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी देखील खेळायची आहे. अशा परिस्थितीत हार्दिकच्या जागी शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवता येईल.

भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रमनदीप सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.

इंग्लंडचा संघ :

जॉस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिलिप सॉल्ट, मार्क वूड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button