आजचे राशिभविष्य : घरातून बाहेर पडताना या गोष्टी करायला विसरू नका, यश तुमचंच!

मुंबई : जेव्हा तुम्ही कोणतंही शुभ काम करण्यासाठी घरातून बाहेर पडतात. जसं की इंटरव्ह्यू देण्यासाठी,एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, लग्नाची बोलणी करण्यासाठी अशा कामांसाठी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा काही नियमांचं कटाक्षानं पालन करा. तुम्ही जेव्हा- जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा-तेव्हा जर या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकतं.
तुम्ही जर घरातून बाहेर पडताना काही नियमांचं नित्यनियमाने पालन केलं तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. हळूहळू तुमचं नशीब देखील तुमची साथ देईल. तुम्हाला अनेकदा असं जाणवलं असेल की तुम्ही एखादं काम करण्यासाठी बाहेर पडलात मात्र त्या कामामध्ये काही तरी अडचणी आल्या, ते काम पूर्ण होऊ शकलं नाही. जर तुम्हाला अशा गोष्टींपासून वाचायचे असेल तर ज्योतिष शास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत, काही उपाय सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात घराच्या बाहेर पडताना कोणत्या गोष्टींचं पालन करायचं.
हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर
ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही घरातून बाहेर पडत आहात आणि त्याचवेळी कोणी शिंकलं तर घरातून बाहेर पडलं नाही पाहिजे.अशावेळी घरातून बाहेर पडणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही वेळासाठी घरातच थांबा, त्यानंतर घरातून बाहेर पडा. तुम्हाला जेव्हा घरातून बाहेर पडायचं असेल तेव्हा पाणी प्या आणि मगच घराच्या बाहेर पडा. तुम्ही घराच्या बाहेर पडताना एखादी व्यक्ती दोनदा शिंकली तर याचा अर्थ असा की तुम्ही ज्या कामाला जाणार आहात ते तुमचं काम पूर्ण होणार आहे.
तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही तुमची नासिका अर्थात नाकांच्या स्वरावर लक्ष द्या, जर डाव्या बाजुने जर स्वर असेल तर तुमचा डावा पाय आधी घराच्या बाहेर ठेवा आणि जर उजव्या बाजुनं स्वर असेल तर तुमचा उजवा पाय घराच्या बाहेर ठेवा.असं केल्यानं तुम्ही ज्या कामासाठी घरातून बाहेर पडणार असाल त्या कामात तुम्हाला यश मिळेल, कामात काही अडथळे येत असतील तर ते दूर होतील असं ज्योतिष शास्त्रा सांगतं.