शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ पुन्हा भिडणार? महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

पुणेः काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेची अंतिम लढत शिवराजे राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली आणि पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. अंतिम लढतीमध्ये शिवराज राक्षे याची पाठ जमिनीला टेकलेलीच नव्हती. मात्र, पंचांनी घाईमध्ये स्पर्धेचा निकाल जाहीर केला असलल्याचा आरोप पंचांवर करण्यात आला. यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निकालाबाबत समाजात अनेक उलट सुलट चर्चा होत होत्या. अखेर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीबाबात मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या चौकशी समितीमध्ये ५ सदस्य असून विलास कथुरे यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच २८ फेब्रुवारीपर्यंत या चौकशी समितीने लढतीसंदर्भात अहवाल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषेकडे सूपर्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – ‘शिवसेना फुटीबाबत उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विलास कथुरे हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आहेत. आता चौकशी समिती यावर कोणता निर्णय घेते ते पाहणे महत्वाचे असणार आहे. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी २०२५ चा विजेता म्हणून पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम निकालाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
स्पर्धेच्या निकालानंतर शिवराज राक्षेला राग अनावर झाल्याने त्याच्याकडून पंचाची कॅालर धरत त्यानंतर लाभ मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. तर काहींनी ही कुस्ती पुन्हा घेण्याची मागणी देखील केली होती.
निकालाच्या विरुध्द पैलवान शिवराज राक्षे यांनी आजपर्यंत कोणतीच लेखी हरकत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे नोंदवली नाही. परंतु समाजात पंचांनी दिलेल्या निकालाबाबत अनेक उलटसुलट चर्चा होत होत्या. यामुळेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने या निकालाबाबत चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.