ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खेळामुळे नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत; महापौर रवि लांडगे

निगडीत आमदार चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात

पिंपरी | शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळाला सुद्धा महत्त्व देणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी क्रीडेला तितकेच महत्त्व आहे. खेळामुळे नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास विकसित होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. खेळात खिलाडूवृत्तीचे असणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात ग्रामीण खेळाडू विकास प्रकल्प व आमदार उमा खापरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ चे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा 

ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं – आयपीएस डॉ. महेश भागवत

याप्रसंगी विधानपरिषद सदस्या आमदार उमा खापरे यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिकेच्या कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्य अमित गावडे, ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर, जयदीप खापरे यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, खेळाडू उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि शिस्त यासाठी खेळात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धांमधून ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळते. अशा स्पर्धांमधूनच भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत असतात, असे देखील यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी खेळाडू व प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहण्यात मिळाला. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याची संधी उपलब्ध झाली असून युवकांमध्ये क्रीडाविषयी आकर्षण वाढणार आहे, अशा भावना यावेळी खेळाडूंनी व्यक्त केल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button