Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई

अवकाळी पावसाचे संकट, पुण्यात अलर्ट जारी

पुणे : पुणे जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुण्यात सकाळपासून पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तीन दिवस अवकाळी पाऊस असणार आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक शहरात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बीड, पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याचा योग्य ठिकाणी साठा करावा, असा सूचना देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button