Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेराजकारण

गरीब रुग्णांना आता तातडीने मदत! मुख्यमंत्री सहायता निधीतून २० गंभीर आजारांवर उपचार

पुणे : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आशेचा किरण ठरत आहे. या निधीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात ३ हजार ८६१ रुग्णांना सुमारे ३४ कोटी ५३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक वर्षात २०२५-२६ मध्ये राज्यातील ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील ३ हजार ८६१ रुग्णांना सुमारे ३४ कोटी ५३ लाख ९९ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

या निधीतून २० गंभीर आजारांसाठी मदत केली जाते. त्यात कॉक्लिअर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, अस्थिमज्जा, हात आणि गुडघ्याचे प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण अशा एकूण २० आजारांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने दिली आहे.

हेही वाचा –  नवीन गॅस कनेक्शन घेणं झालं अवघड ! एलपीजी सिलिंडरबाबत मोठी अपडेट आली समोर

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे जिल्हास्तरीय कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्जप्रक्रिया राबविण्यात येत असून, तातडीने अर्जांचा निपटारा केला जातो. त्यासोबतच सामंजस्य करार, निधी संकलनाच्या माध्यमातून समाजातील मदत करणारी रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, संस्था, दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेतले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत झालेल्या सुधारणांमुळे पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक साहाय्य मिळत आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, बीपीसीएल फाउंडेशन व टाटा मेमोरिअल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत. गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी १८००१२३२२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button