TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकादरम्यान दीडशे वर्षाहून अधिक जुन्या कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम

मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकादरम्यान दीडशे वर्षाहून अधिक जुन्या कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम शुक्रवारी सुरू झाले. येत्या तीन महिन्यात मेगाब्लॉक घेऊन हा उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.पश्चिम रेल्वेच्या अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानंतर ब्रिटिशकालीन पुलांची सुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

या तपासणीदरम्यान सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकादरम्यान १८६८ साली बांधण्यात आलेला कर्नाक उड्डाणपूल धोकादायक असल्याचे उघड झाले. नुकताच २२ ऑगस्ट रोजी हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर मध्य रेल्वेने शुक्रवारी प्रत्यक्षात पाडकामाला सुरुवात केली. तसेच, मध्य रेल्वेकडून मध्यरात्रीच्या वेळी आणि रविवारी ब्लॉक घेऊन पुलाचे तोडकाम केले जाणार आहे. गर्डर काढण्यासाठी ३० तासांचा मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button