Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“कान उघडे ठेवायचे, कमी बोलायचे”; सुप्रिया सुळेंचा पार्थ पवारांना सल्ला

मुंबई | ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्यसभेसाठी आज (५ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान भवन, मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल दोन्ही पक्षांचे आभार मानले. तसेच पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना त्यांनी महत्त्वाचा सल्लाही दिला.

लोकसभा किंवा राज्यसभेत कान उघडे ठेवायचे, कमी बोलायचे आणि बोलण्याची संधी मिळाली तर अभ्यासपूर्ण बोलायचे, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला. सभागृहात बसलेले सदस्य अत्यंत जाणकार असतात आणि देशाचे लक्ष संसदेवर असते, त्यामुळे खासदार म्हणून मोठी जबाबदारी असते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा      :            राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित; राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर 

सुप्रिया सुळे यांनी यावेळी शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याची आठवणही सांगितली. पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश करताना “बारामती मतदारसंघामुळे ही पायरी चढण्याची संधी मिळाली हे कायम लक्षात ठेवा,” असे वडील शरद पवार यांनी सांगितल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत पारदर्शक चौकशी व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. रोहित पवार सातत्याने याबाबत मागणी करत असून जय आणि पार्थ पवार तसेच राज्यातील अजित पवारांवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिकही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button