Breaking-newsमुंबई
शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्सची ७९२ अंकांची घसरण

आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स ७९२ अंकांनी घसरला. सेन्सेक्स ३४ हजार ३७६.९९ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये २८३ अंकांची घसरण बघायला मिळाली. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एका दिवसात ४.१९ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तरीही म्युच्युअल फंड आणि एसआयपी यातली गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांनी सोडू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
ऑईल अँड गॅस, बँकिंग, मेटल, ऑटो, एफएमसीजी, पॉवर या सगळ्यांच्या शेअर्सवर परिणाम झालेला बघायला मिळाला. महत्त्वाच्या शेअर्समध्ये एचपीसीएल २४ टक्के, बीपीसीएल २० टक्के, आयओसी १६ टक्के, ओएनजीसी १४.७ टक्के, गेल १० टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ६.३ टक्के, अदानी पोर्ट ५.४ टक्के, एसबीआय ४.७ टक्के आणि भारती एअरटेल ४.३ टक्के घसरून बंद झालेले बघायला मिळाले. तर इन्फोसिस, टीसीएस, टायटन आणि इंडस्ड बँक यांचे शेअर्स २.५ टक्के ते १.४ टक्क्यांपर्यंत वधारून बंद झाले. असे असले तरीही गुंतवणूकदारांनी एसआयपी किंवा म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक करणे सोडून देऊ नये असे आवाहन शेअर विषयक तज्ज्ञांनी केले आहे.





