breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

MPL: पिंपरी-चिंचवडचे खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणार!

भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांचा विश्वास : ‘एमपीएल’मध्ये निवड झालेल्या शहरातील क्रिकेटपटूंचा सन्मान

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील खेळाडुंमध्ये गुणवत्ता आहे. त्यादृष्टीने पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून, आगामी काळात शहराचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचा लौकीक वाढवतील, असा विश्वास भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

बहुचर्चित महाराष्ट्र प्रिमिअर लीग (MPL) स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडमधील क्रिकेटपटू मनोज यादव आणि सोहन जमाले यांची निवड झाली. कोल्हापूर टस्कर्स संघातून यादव व पुणेरी बाप्पा संघासाठी जमले यांची निवड झाली. यानिमित्ताने जगताप यांनी त्यांचा सत्कार केला आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक संतोष कांबळे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दुधारे, प्रशिक्षक ओंकार सपकाळ उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याची ‘पुणेरी बाप्पा’ संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांमध्ये या स्पर्धांबाबत उत्सुकता वाढली आहे. स्पर्धेच्या लिलावासाठी ३०० हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये अ गटात रणजी करंडक खेळाडूंचा समावेश होता. एमपीएलमुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
**

पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचा नावलौकिक करीत आहेत. MPL सुद्धा आपले खेळाडू गाजवतील, असा विश्वास आहे. शहराची ओळख ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून व्हावी. यासाठी लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याबाबत सकारात्मक पुढाकार घेण्यात आला. हा वारसा पुढे चालवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
– शंकर जगताप, निवडणूक प्रमुख, चिंचवड, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button