breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१० वी पुरवणी परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

SSC Supplementary Examination : दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला असून आता येत्या जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेसाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यास 16 जून २०२३ पर्यंत मुदत आहे, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे, Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’; निलेश राणेंची खोचक टीका

या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दहावीसाठी www.mahasscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.

दरम्यान नियमित शुल्कासह १६ जून २०२३ पर्यंत, तर विलंब शुल्कासह २१ जून २०२३ पर्यंत अर्ज सादर करता येईल. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असंही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button