breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी ते दापोडी मेट्रो धावणार – ब्रिजेश दीक्षित

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी मार्गावर मेट्रो धावणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी रविवारी (दि. 30) दापोडीतील मेट्रोच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सुरु होण्यासाठी महामेट्रोने पाच वर्षांचे ध्येय निश्चित केले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने कामे सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पिलरचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे 2019 मध्ये स्टेशनच्या कामांना गती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रील, फिटिंग, ट्रॅक, वीज आणि सिग्नलचेही काम त्याच वेगाने करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या आठ किलोमीटरच्या मार्गावर पीसीएमसी, संत तुकाराम नगर, फुगेवाडी आणि दापोडी या स्थानकांचे काम सुरु आहे, असे दीक्षित म्हणाले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला खडकी ते रेंजहील हे काम सुरु होईल. खडकी, दापोडी आणि रेंजहील येथील संरक्षण विभागाच्या जमिनीसाठी 17 कोटी 30 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर, लायसन्ससाठी दरवर्षी 1 कोटी 71 लाख रुपये देण्यात येणार आहेत. या मार्गावरील संरक्षण विभागाच्या परवानगीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असेही दीक्षित म्हणाले.

पिंपरी ते निगडी मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मेट्रोकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. महापालिकेमध्ये त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तिथून राज्य सरकार आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीसाठी अहवाल जाणार आहे. येत्या तीन महिन्यात पिंपरी ते दापोडी या मार्गावर ट्रॅक बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही दीक्षित यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत प्रकल्प संचालक महेश कुमार, एस शिवनाथन, गौतम बि-हाडे, राजेंद्र प्रसाद, रामनाथ सुब्रमण्यम आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button