breaking-newsराष्ट्रिय

नीरव मोदीवर अटक वॉरंट जारी

नवी दिल्ली – कर्ज बुडवून विदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यावर महसुल गुप्तचर विभागाने कस्टम ड्युटी चुकवल्याच्या कारणावरून अटक वॉरंट जारी केले आहे. त्याला हे वॉरंट इमेलवरून पाठवण्यात आले आहे. गुजरात मध्ये सूरत येथील कोर्टाद्वारे त्याच्याविरूद्ध हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. तेथे त्याला या प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते परंतु तो तेथे उपस्थित राहीला नाहीं यामुळे त्याच्यावर हे वॉरंट बजावण्यात आले आहे.

गुजरातमधील एसईझेड प्रकल्पातील त्याच्या युनिटसाठी त्याने बराच माल कस्टम ड्युटीची सूट घेऊन मागवला. नियमानुसार तो माल त्याने विदेशात निर्यात करणे अपेक्षित होते पण त्याने ते न करता तो देशातच विकला आणि करसवलत योजनेचा गैरफायदा घेतला असा त्याच्यावर आरोप आहे. त्याने कमी किंमतीचे हिरे र्आणि मोती निर्यात केले. आणि आयात केलेल्या मालावर प्रक्रिया करून तयार झालेला हाच तो माल होता असे त्याने कस्टम अधिकाऱ्यांना दाखवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button