breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिकांकडून ठाण्यात रक्तदान; शहराध्यक्ष रवी मोरे यांची सामाजिक बांधिलकी

ठाणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या या संकटाच्या काळात महाराष्ट्रभर राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक जमेल ती मदत करत आहेत. ठाण्यात ठाणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीला १ लाखाची मदत जाहीर केली आहे.

तसेच, राज्यातील संभाव्य रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील कोपरी परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांना ग्लोव्ह्स आणि मास्क्सचं वाटप केले.

विशेष म्हणजे, रोज रात्री ठाणे शहर अध्यक्ष श्री. रवी मोरे, त्यांचे कुटुंबीय आणि महाराष्ट्र सैनिक हे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी चहा आणि खाद्यपदार्थ घेऊन जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button