ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मैला शुद्धीकरण केंद्रांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील 14 मैला शुद्धीकरण केंद्रांची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वर्षे कालावधीकरिता 76 लाख रुपये खर्च होणार आहे.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरात दररोज 450 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी सुमारे 290 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. या सांडपाणी, मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात 14 मैला शुद्धीकरण केंद्रे बांधण्यात आली आहेत.

मैला शुद्धीकरण केंद्रांचे वार्षिक चालन आणि देखभाल दुरुस्ती ठेकेदारांमार्फत करण्यात येते. या मैला शुद्धीकरण केंद्रांची तपासणी त्रयस्थ संस्थांकडून केली जाणार आहे. त्यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.

या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविल्या. त्यासाठी 98 लाख 11 हजार रुपये खर्च अपेक्षित धरला. त्यानुसार चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यांपैकी ‘मोनेरा लॅब’ या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 22.50 टक्के कमी म्हणजेच 76 लाख 3 हजार रुपये दराने निविदा सादर केली. तीन वर्षांसाठी या संस्थेला काम दिले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button