breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

#CoronaVirus: सलमान खानने 25 हजार कामगारांची उचलली जबाबदारी!

कोरोना विषाणूमुळे फैलावणाऱ्या ‘कोविड १९’नं संपूर्ण जगासोबतच भारतालाही विळखा घातलाय. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे… पण सकारात्मक बाब म्हणजे अनेक रुग्ण बरेही होत आहेत. करोनामुळे २१ दिवसांसाठी देश लॉकडाउन झाला आहे. मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीयांना या लॉकडाउनचा फारसा फटका बसला नसला तरी हातावर पोट असणाऱ्यांसाठी मात्र हा कठीण काळ आहे.

अनेकांना दिवसाचं धान्य कुठून आणायचं हा प्रश्नही आहेच. या कठीण काळात अनेक सेलिब्रिटी स्वतःहून मदत करत आहेत. एकीकडे अक्षय कुमारने करोना विरुद्धच्या लढाइत २५ कोटींची मदत केली. तर आता सलमानने तब्बल २५ हजार मजदूरांची जबाबदारी उचलली आहे. याविषयी सलमानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले की, ‘सलमान जी मदत करत आहे त्यावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण मला याबद्दल फारसं काही माहीत नाही. पण माझ्या कुटुंबाचा एक नियम आहे. आमचा पैसा जिथे जातोय तिथे तो दिसला पाहिजे आणि कोणाच्यातरी कामी आला पाहिजे. आम्ही आमच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी आणि सुरक्षा रक्षकांसाठीही जेवणाची सोय करत आहोत. आपल्या सर्वांनाच आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button