breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

‘टाटा स्काय ब्रॉडबँड’ लवकरच लँडलाइन सेवा लाँच करण्याच्या तयारीत

टाटा स्काय ब्रॉडबँड लवकरच लँडलाइन सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या सेवा सुरू करण्यासाठी आपल्या अधिकृत साइटवर एक टीझर जारी केले आहे. या टीझरनुसार, लँडलाइन सेवा सुरू करण्यात येणार आहे. ब्रॉडबँड युजर्संवा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. ही सेवा कधीपर्यंत सुरू करणार, याविषयी अद्याप तारीख जाहीर केली नाही. २०१५ मध्ये टाटा स्काय ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात आली होती. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल यासारख्या कंपन्या आपल्या युजर्संना लँडलाइन सेवा देत आहेत.

टाटा स्कायने आतापर्यंत लँडलाइन सेवेची लाँचिंग आणि किमतीसंबंधी अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. कंपनीकडून एक टीझर जारी करण्यात आला आहे. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग देण्याचे म्हटले आहे. सध्या टाटा स्कायचे तीन अनलिमिटेड ब्रॉडबँड प्लान बाजारात उपलब्ध आहे. ज्यात युजर्संना २५, ५० आणि १०० एमबीपीएसच्या स्पीडने डेटा मिळतो. तर २५ एमबीपीएस स्पीडच्या प्लानची किंमत ९०० रुपये, ५० एमबीपीएस प्लानची किंमत १ हजार आणि १०० एमबीपीएस स्पीडच्या प्लानची किंमत ११०० रुपये आहे. बीएसएनएलचा ५५५ रुपयांचा ब्रॉडबँड प्लानमध्ये युजर्संना २० एमबीपीएस च्या स्पीडने १०० जीबी डेटा मिळतो. तसेच, युजर्संना बीएसएनएल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. हा प्लान महाराष्ट्र, गोवा या सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

एअरटेलच्या ७९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये युजर्संना १०० एमबीपीएसच्या स्पीडने १५० जीबी डेटा मिळतो. तसेच, कॉलिंगसाठी लँडलाइन कनेक्शन दिले जाते. तसेच, युजर्संना एअरटेल एक्स्ट्रिम अॅपवर प्रीमियम कन्टेंट फ्री पाहता येवू शकतात. जिओचा ६९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये युजर्संना या प्लानमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने १०० जीबी डेटा मिळतो. तसेच, युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येवू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button