breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

मुंबई-पुणे एक्सप्रेस ‘वे’वर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पिंपरी – मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भातान बोगद्याजवळ (कि.मी 15.7) उभ्या असलेल्या ट्रेलरला दुधाच्या टँकरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांना मृत्यू झाला. आज मंगळवारी (दि. 18) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार. ट्रेलर (RJ-02, JB-2043) हा पंक्चर झाल्याने मुंबई लेनवर भातान बोगद्याजवळ उभा होता. टायर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगाने आलेला दुधाचा टँकर (MH-43, AD-6029) ट्रेलरवर जोरात आदळला. या अपघातात दुध टँकरचा चालक हाजी फुला (वय 43, रा. वाराणसी उत्तर प्रदेश) व सहप्रवासी विजय निवृत्ती मरगज (वय 41 रा. विलेपार्ले ईस्ट मुंबई) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच घटनास्थळावर आयआरबीचे सुरक्षा पथक व वाहतूक नियंत्रण पथक दाखल झाले. जखमींना बाहेर काढून चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button