बुलढाण्यात शिंदे गटाकडून बंड? आमदार संजय गायकवाडांनी उमेदवारी अर्ज भरला
पुणे | भाजपने शिंदे गटाच्या जागा बळकावण्याचं सत्र सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटात भाजपविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. यातच बुलढाणा मतदार संघातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी आज गुरूवारी दुपारी २च्या सुमारास अर्ज दाखल केला. गायकवाडांनी एक नाहीतर दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे गटाची अद्याप लोकसभेची यादी आलेली नाही. तरीही गायकवाडांनी अर्ज भरल्याने आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – चित्रपट हिट होत नसल्याने राजकारणात प्रवेश? कंगना म्हणाली..
दरम्यान, या जागेवरून प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे खासदार आहेत. ते शिंदे गटातच आहेत. यामुळे जाधवांचे तिकीट कापले जाणार की गायकवाडांना बंडखोर घोषित केले जाणार, याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. या बंडखोरीमुळे शिवसेनेतच वर्चस्ववाद सुरु असल्याचे समोर आले आहे.