TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पिंपळे सौदागरमधील पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याचे आमदार अश्विनी जगताप यांचे आश्वासन

पिंपरी : पिंपळे सौदागर मधील विविध सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर बांधलेल्या नवीन टाकीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. यासाठी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांनी आमदार अश्विनी जगताप यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी आपण स्वतः लक्ष घालून पिंपळे सौदागरमधील पाणी प्रश्न तातडीने सोडवणार असल्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी कुंदा भिसे यांना दिले.

यावेळी माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड महिला मोर्चा अध्य्क्षा उज्वला गावडे, चिंचवड विधानसभा मंडल अध्यक्षा महिला मोर्चा पल्लवी वाल्हेकर, वैशाली जवळकर आदी उपस्थित होत्या. दरम्यान याबाबत कुंदा भिसे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनाही निवेदन दिले आहे.

त्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अमृत योजनेतून पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. २० दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेल्या या टाकीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. मात्र, या टाकीतून पाणीपुरवठा सुरू केला गेला नाही.

कुणाल आयकॉन रोडच्या दोन्ही बाजूच्या परिसराला पिंपळे सौदागर स्मशानभूमी समोरील टाकी व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय येथील टाकीतून पाणीपुरवठा होतो. या परिसरात सोसायट्यांची संख्या मोठी असून त्यांना महापालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचा दाबही कमी असतो. त्यामुळे नागरिकांचे होल होत असून पर्यायाने त्यांना पाणी विकत घेण्याची वेळ येते. परिणामी त्यांना मोठी आर्थिक झळ बसते.

कुणाल आयकॉन रोडच्या दोन्ही बाजूला ३०० एमएम व्यासाच्या जलवाहिन्या अमृत व स्मार्ट सिटी योजनेतून टाकल्या आहेत. या नवीन जलवाहिनीतून नवीन टाकीतील पाणीपुरवठा सुरू केल्यास पिंपळे सौदागरमधील बराचसा पाणी प्रश्न मिटणार आहे. तसेच या टाकीतील पाण्याबरोबर बायपास पाणीपुरवठ्याचेही योग्य नियोजन करावे असे भिसे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button