TOP Newsताज्या घडामोडीमराठवाडा

फक्त अभिनेत्रींच का करतात आईचा रोल?

या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटात काजोलनं आईची भूमिका साकारली आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काजोलनं चित्रपटात अभिनेत्यांना तरुणांच्या भूमिका मिळण्यावर वक्तव्य केलं आहे.  बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काजोल ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. नुकताच काजोलचा सलाम वेंकी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

पाहा काय म्हणाली काजोल –

सलान वेंकी चित्रपटात काजोलनं 24 वर्षीय मुलाच्या आईची भूमिका साकारली आहे. दरम्यान, या आधीही काजोलनं अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत. एकीकडे काजोल आईच्या भूमिका साकारत असताना तिच्यासोबतचे अभिनेते हे अजूनही तरुण अभिनेत्रींसोबत लव्ह इंट्रेस्टच्या भूमिका साकारताना दिसतात. यावर काजोलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका गोष्टीचा खुलासा केला. काजोल म्हणाली की, आजही इंडस्ट्रीत हीरोचं वय वाढत नाही, फक्त अभिनेत्रींचेच कसे वाढते. त्या फक्त त्यांच्या वयाच्या भूमिका करत आहेत. 

https://www.instagram.com/kajol/?utm_source=ig_embed&ig_rid=fe34f0ff-c8f6-4d10-8378-d12f7fe3e69a

काजोलच्या म्हणण्यानुसार, ‘चित्रपटसृष्टी हा व्यवसाय आहे. प्रत्येक हीरोवर इतकी गुंतवणूक केली जाते की चित्रपट हिट होणं ही त्यांच्यावर असलेली मोठी जबाबदारी ठरते आणि कुठेतरी हिरोही नंबर गेममध्ये अडकून पडतात. याबद्दल बोलताना काजोलनं तिचा पती आणि अभिनेता अजय देवगणचे कौतुक केले आणि म्हणाली, ‘अजय हा एकमेव अभिनेता आहे जो अभिनयाच्या प्रत्येक जॉनरमध्ये यशस्वी आहे’.

काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील आई आणि मुलाची कहाणीन प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान, प्रदर्शनानंतर लगेचच चित्रपट लीक झाल्याच्या देखील चर्चा सुरु झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button