सच्चाई छुपाते हैं, इसलिए रोज़ भटकाते हैं! राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे काही गौतम आदामी यांचा मुद्द सोडायला तयार नाहीत. शरद पवार यांनीही अदाणींच्या मुद्यावर जास्तच गदारोळ झाला हे म्हटलं आहे. मात्र राहुल गांधी यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा गौतम अदाणी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी एक वर्ड पझल दाखवलं आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत आणि ती नावांमध्ये अदाणी हे नाव कसं लपलं आहे हे त्यांनी दाखवलं आहे. हे लोक सत्य लपवतात म्हणूनच रोज लोकांची दिशाभूल करतात. अदाणींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुणाचे आहेत? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
त्यामध्ये गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांची नावे लिहीली आहेत. त्या नावांमधून बरोबर अदाणी हे नाव कसं समोर येतं हे या वर्ड पझलमध्ये दाखवलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.