breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

नवीन वर्षात आर्थिक नियोजनाबाबत करा ‘हे’ ५ संकल्प; आपत्कालीन परिस्थितीत अडचणी राहतील दूर

5 Financial Resolutions For 2024 : दोन दिवसांत नवीन वर्ष सुरू होणार आहे. गुंतवणूकदारांनी नवीन वर्षासाठी काही आर्थिक संकल्प करावेत. जेणेकरून येत्या वर्षभरात पैशाचे व्यवस्थापन मजबूत राहील आणि आपत्कालीन परिस्थितीतही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. त्यासाठी हे ५ संकल्प जरूर करा.

1. नवीन वर्षासाठी सर्वोत्तम गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकदारांनी वैयक्तिक वित्ताशी संबंधित त्यांचे ज्ञान वाढवावे. यामुळे तुम्ही योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकाल.

2. नवीन वर्षातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची रक्कम वाढवायला हवी.

3. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या पोर्टफोलिओचा आढावा घ्या. तुम्ही एक दोन गोष्टींमध्येच मोठी गुंतवणूक केली आहे का? जसे की फक्त इक्विटी, सोने, रिअल इस्टेट, एफडी, बॉंड इत्यादी.

हेही वाचा  –  हिंदू तरूणांनी दूध पिऊन नवीन वर्ष साजरं करावं; विश्व हिंदू परिषदेच आवाहन

4. आपत्कालीन फंड असणे हा आर्थिक नियोजनाचा सुवर्ण नियम आहे. कारण आयुष्यात कधीही अनपेक्षित काहीही घडू शकते. यासाठी तुम्ही तयार असावे. म्हणूनच आपत्कालीन निधी नेहमी वेगळा ठेवा. जो आजारपण, नोकरी गमावणे यासारख्या अचानक येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रभावी ठरतो.

5. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे गुंतवणूक करणेही सोपे झाले आहे. आजच्या काळात ऑटो डेबिट करणे अवघड नाही. युटिलिटी बिले, क्रेडिट कार्ड बिले यांसारखी पेमेंट ऑटो डेबिट करणे हा एक चांगला आर्थिक निर्णय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button