breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंब्र्याहून सोलापुरात आलेल्या पोलिसाला कोरोनाची बाधा
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे नेमणुकीस असलेला पोलीस कर्मचारी स्वतःला बरे वाटतनाही म्हणून १४ दिवसांच्या गृह विलगीकरणात असताना मुंब्र्याहून दुचाकीने सोलापुरात स्वगृही आला. नंतर त्याचा आजार वाढला असता वैद्यकीय तपासणीअंती त्याला करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार स्पष्ट होताच प्रशासनाने करोनाबाधित पोलीस कर्मचारी राहात असलेल्या रविवार पेठेतील जोशी गल्लीचा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून उपाययोजना हाती घेतल्या.