breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा मान पिंपरी चिंचवडला

पिंपरी : १००वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची लगबग सुरू झाली असून मोरया गोसावी क्रीडा संकुल वर या तयारीने वेग घेतल्याचे दिसते.

अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वाटचालीतील हे शतकी संमेलन असल्याने या संमेलनाला विशेष महत्व आहे. राज्यभरात या नाट्य संमेलनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आठवड्याभरावर येवून ठेपलेल्या या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे काम मोरया गोसावी क्रीडा संकुलवर जोरदार तयारी सुरू आहे

हेही वाचा – हिंदू तरूणांनी दूध पिऊन नवीन वर्ष साजरं करावं; विश्व हिंदू परिषदेच आवाहन

मुख्य सभामंडपांतील काम ५० टक्के पूर्ण झाले असून १ जानेवारीपर्यंत संमेलन स्थळांवरील संपूर्ण काम पूर्ण होईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुख्य सभामंडप हा ६० बाय ८० फूट इतके मोठे बांधण्यात आला आहे. तसेच लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी भव्य बालमंच देखील उभारण्यात येत आहे. अखिल भारतीय म

राठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे.मुख्य सभामंडप आणि बालमंच याशिवाय शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह (चिंचवड), निळू फुले नाट्यगृह (सांगवी), गदिमा नाट्यगृह (प्राधिकरण), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) अशा सहा ठिकाणी शंभराव्या व्या संमेलनामध्ये रंगभूमीवर गाजलेली व्यवसायिक नाटके, बालनाट्य, उल्लेखनीय एकांकिका, प्रायोगिक नाटके, संगीत रजनी, संगीत नाटक यांसह ६४ विविध सांस्कृतिक व नाट्य विषयक कार्यक्रम व नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button