breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
चेंबूरच्या माहुल परिसरात मृत शार्क
मुंबई : खोल समुद्रात आढळणारा शार्क मासा सोमवारी सायंकाळी माहुल गाव परिसरातील समुद्रकिनारी आढळला. अज्ञात इसमांनी त्याला तस्करीसाठी मारून या ठिकाणी फेकल्याचा आरोप प्राणिमित्रांनी केला आहे. माहुल येथे समुद्रापासून काही अंतरावर असलेल्या एका मोठय़ा नाल्यालगत हा मासा आढळला. याची माहिती मिळताच मानव अभ्यास संघाचे काही प्राणिमित्र तात्काळ तिथे गेले. त्यांनी पाहणी केली असता, या माशाचे काही भाग कापल्याचे आढळले. त्यामुळे त्याची तस्करीसाठी हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून माशाला ऐरोली वन खारफुटी विभागाकडे सोपवले आहे. १४ फूट लांब असलेल्या या माशाचे वजन ४०० ते ५०० किलो आहे.