breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडी

‘या’ राष्ट्रपतींनी जाहीरपणे टोचली कोरोना लस

कोरोना महामारीमुळे जगभर हाहाकार उडाला आहे. या व्हायरसने जागतिक स्तरावर सर्वच राष्ट्रांचे नुकसान केले आहे. या व्हायरसवर लस शोधण्यात अनेक देशांमधील संस्थांना यश आले आहे. बरेच देशांमध्ये लसीकरण मोहीम राबवली जात आहे. अनेक देशांमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ लागली आहे. सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळलेल्या अमेरिकेत देखील लसीकरण सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे कोरोनाची लस टोचून घेतली आहे.

जो बायडन यांनी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा पहिला डोस घेतला. सर्वांसाठी लस उपलब्ध झाल्यावर याबाबत नागरिकांच्या मनात कोणतीही भिती नसावी, यासाठी त्यांनी लाईव्ह टिव्हीवर लस टोचून घेतली. आपण लस टोचून घेतल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. यासाठी त्यांनी डॉक्टर आणि वैज्ञानिकांचे देखील आभार मानले.

बाइडन यांनी ट्विट केले की, आज मी करोनाची लस घेतली. दिवसरात्र मेहनत घेऊन हे शक्य करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे आभार. आम्ही तुम्हाला खूप काही देणं लागतो. अमेरिकेच्या नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा करोना लस उपलब्ध तेव्हा तुम्ही ती घ्यावी.

दरम्यान, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसदेखील पुढच्या आठवड्यात जाहीरपणे कोरोना लस घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button