ताज्या घडामोडीपुणे

​ आरकेएल गॅलेक्सी स्कूलमध्ये भव्य रक्तदान शिबीर; ५० हून अधिक पालकांचे महादान

​ सामाजिक बांधिलकीतून १०० हून अधिक पालकांची नोंदणी; 'रॉबिन हूड आर्मी'चे सहकार्य

पुणे/आळंदी,प्रतिनिधी 

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि मानवता निर्माण करण्यासाठी अग्रस्थानी असलेल्या ‘आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल’च्या (RKL Galaxy International School) वतीने आज सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला शाळेतील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, परिसरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.

​शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिरासाठी पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शिबिरादरम्यान तब्बल १०० हून अधिक पालकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५० हून अधिक रक्तदात्यांनी प्रत्यक्ष स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा –  लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ होणार भारताचे नवे लष्करप्रमुख

​हे शिबीर सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ‘रॉबिन हूड आर्मी ब्लड डोनेशन ड्राईव्ह’चे (Robin Hood Army Blood Donation Drive) स्वयंसेवक आणि तज्ज्ञ वैद्यकीय पथक विशेषत्वाने उपस्थित होते. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि सहकार्यामुळे संपूर्ण रक्तदान प्रक्रिया अत्यंत सुलभरीत्या संपन्न झाली.

​सदरील शिबिराचे नियोजन व संचालन उत्साहात पार पडले. याप्रसंगी शाळेचे कार्यकारी अधिकारी डॉ. पुष्कर चोबे, सौ. मित्तल शाह यांच्यासह शाळेचे प्राचार्य, समन्वयक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांच्या या ‘महादाना’मुळे परिसरात आरकेएल गॅलेक्सी स्कूलच्या या कौतुकास्पद उपक्रमाची जोरदार चर्चा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

​”आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही, तर समाजोपयोगी कार्यांमध्येही नेहमीच पुढे असते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये सेवाभावाचा संदेश पोहोचला आहे. भविष्यातही अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजहितासाठी योगदान देण्याचा आमचा संकल्प कायम राहील.”

— शाळा व्यवस्थापन

​”रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. एका व्यक्तीने केलेले रक्तदान अनेकांचे प्राण वाचवू शकते. आमच्या शाळेतील पालकांनी आज दाखवलेली सामाजिक बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच असे मानवतावादी संस्कार रुजावेत, हाच या शिबिरामागील आमचा मुख्य उद्देश होता. भविष्यातही आम्ही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत राहू.”

 -डॉ. पुष्कर चोबे (कार्यकारी अधिकारी, आरकेएल गॅलेक्सी स्कूल)

​”शाळेच्या आवाहनाला मान देऊन १०० हून अधिक पालकांनी नोंदणी केली आणि ५० हून अधिक जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले, हा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. ‘रॉबिन हूड आर्मी’च्या स्वयंसेवकांनी आणि वैद्यकीय पथकाने केलेले नियोजन अत्यंत कौतुकास्पद होते. या यशस्वी उपक्रमाबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते.”

— सौ. मित्तल शाह (आरकेएल गॅलेक्सी स्कूल)

​”शाळेने आयोजित केलेले हे रक्तदान शिबीर अतिशय कौतुकास्पद आणि प्रेरणादायी होते. आपल्या पाल्याच्या शाळेत जाऊन समाजासाठी असे योगदान देता येणे, हा आम्हा पालकांसाठी अभिमानाचा क्षण आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांवरही सामाजिक बांधिलकीचे आणि मदतीचे उत्तम संस्कार होतात. अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि सुरक्षित वातावरणात हे शिबीर पार पडले, याबद्दल मी शाळा व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानतो.”

— गणेश कासार (पालक – इयत्ता ९ वी, लिली)

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button