Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात लवकरच ‘एक राज्य, एक नोंदणी’ मोहीम : बावनकुळे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून ‘एक जिल्हा, एक नोंदणी ‘ मोहिमेंतर्गत उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करण्याची सोय झाली आहे. याच योजनेच्या अनुषंगाने पुढील काळात महायुती सरकार संपूर्ण राज्यासाठी ‘ एक राज्य, एक नोंदणी ‘ मोहीम हाती घेणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित नोंदणी व मुद्रांक शुल्क तसेच भूमी अभिलेख विभागाच्या बैठकीत बावनकुळे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. पंढरपूरसह दहा शहरांमध्ये केंद्र सरकारचा ‘नक्क्षा’ उपक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार असून, नंतर हा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस बावनकुळे यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले, पंढरपूर नगरपालिका हद्दीतील सर्व घरांची भूमी अभिलेख विभागाने ड्रोनच्या साह्याने मोजणी करून मिळकत पत्रिका तयार करून ठेवाव्यात. हे काम अतिशय जबाबदारीने आणि पारदर्शकपणे करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा –  ‘ज्या दिवशी जरांगे मुंबईत उपोषणाला बसतील त्याच दिवशी…’, लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा

प्रारंभी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सचिन भंवर यांनी, सोलापूर स्वामीत्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे ६४३ गावांची मोजणी पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. स्वामीत्व योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात गावठाणाबाहेरील त्यांचीही मोजणी करण्यात येणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. या बैठकीस रणजितसिंह मोहिते-पाटील, समाधान अवताडे, अभिजित पाटील, उत्तम जानकर, डॉ. बाबासाहेब देशमुख, राजू खरे, देवेंद्र कोठे या आमदारांनीसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख आदींची उपस्थिती होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button