HSC 12th Result 2026 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २.९ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने सर्वाधिक ९४.१४ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले, तर लातूर विभागाचा सर्वांत कमी ८४.१४ टक्के निकाल लागला.
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी राज्य मंडळात आयोजित पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे आणि कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
हेही वाचा
मुंबईत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; १,७४५ कोटींचे ३४९ किलो कोकेन जप्त
गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का ९३.२५, तर मुलांचा ८६.८० टक्के इतका आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षा घेण्यात आलेल्या १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे:
- विज्ञान – ९६.४४ टक्के
- कला – ७८.०२ टक्के
- वाणिज्य – ८७.०४ टक्के
- व्यवसाय अभ्यासक्रम – ८२.७४ टक्के
- आयटीआय – ८१.७८ टक्के
बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईट्स लिंक
१) mahahsscboard.in
२) hscresult.mkcl.org
३) sscboardpune.in
४) sscresult.mkcl.org
५) https://results.digilocker.gov.in/
या वेबसाईट्सववर आपला निकाल पाहता येणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा