पाकव्याप्त काश्मीर खाली करा; परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले मत

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सीमा संघर्षादरम्यान, भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, पाकिस्तानशी असलेल्या आमच्या संबंधांबद्दल, आमची भूमिका स्पष्ट आहे.
फक्त दोन्ही बाजूंमध्येच चर्चा होईल. आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. पाकिस्तानने कुख्यात दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावे . त्याचे रेकॉर्ड आणि यादी आम्ही काही वर्षांपूर्वी त्यांना दिली होती. रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरवर चर्चा तेव्हाच होईल जेव्हा पीओके रिकामा होईल आणि पाकिस्तान तो भाग आम्हाला सोपवेल.
हेही वाचा – राज्यात लवकरच ‘एक राज्य, एक नोंदणी’ मोहीम : बावनकुळे
यासोबतच, सिंधू पाणी करारावर भारताची कडक भूमिका कायम ठेवताना ते म्हणाले की, सिंधू पाणी कराराचा प्रश्न आहे, जोपर्यंत पाकिस्तान विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे सोडून देत नाही तोपर्यंत तो स्थगित राहील. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शब्दांचा पुनरुच्चार केला आणि म्हटले की, दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही.