Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयउद्योग विश्व । व्यापारटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

LPG Price Hike: स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता; घरगुती सिलेंडर ४० ते ५० रुपयांनी महागणार, जाणून घ्या नवीन दर!

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे परिणाम

नवी दिल्ली: LPG Price Hike देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत लवकरच ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील ५ ते ७ दिवसांत याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

याआधीच १ मे रोजी व्यावसायिक वापराच्या १९ किलो गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर आता घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलेंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ९१३ रुपये असून मुंबई आणि पुण्यात ती सुमारे ९१२.५० रुपये आहे. संभाव्य दरवाढ लागू झाल्यास या किमती आणखी वाढणार आहेत.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव यामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत आहे. परिणामी, भारतातील एलपीजी दरांवरही त्याचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यामधील वाढती तफावत लक्षात घेता दरवाढ अपरिहार्य असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.

घरगुती गॅस महागल्यास त्याचा परिणाम केवळ घरगुती बजेटपुरता मर्यादित राहणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, टिफिन सेवा, केटरिंग व्यवसाय आणि इतर खाद्यसेवांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दरही वाढू शकतात.

दरम्यान, या संभाव्य दरवाढीमुळे राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीनंतर विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली असून, घरगुती गॅस दर वाढल्यास हा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाकडून अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नसला तरी बाजारातील हालचाली आणि सुरू असलेल्या चर्चांमुळे लवकरच दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button