राज्यातील 6 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट; मुंबई पुण्यात काय स्थिती?

Weather Update : यंदा तब्बल 12 दिवस आधी मान्सून दाखल झाला आहे. मुंबई पुण्यासह अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडलं आहे. मागचे पाच दिवस मुसळधार पावसानं राज्यात धुमाकूळ घातला. त्यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. गेल्या दोन दिवसांपासून पावासाने थोडी उसंत घेतली असून पुढचे चार दिवस मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच, राज्यातील सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या चार जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा – ती चॅट करत होती त्याने नकार दिला म्हणून…; हगवणे यांच्या वकिलाचा न्यायालयात खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
तसेच, रायगड, जळगाव, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलडाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.