ती चॅट करत होती त्याने नकार दिला म्हणून…; हगवणे यांच्या वकिलाचा न्यायालयात खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात २८ मे रोजी पुण्यातील न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी आरोपींच्या वकिलाने खळबळजनक दावे करत वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वैष्णवीचा पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे यांना एका दिवसाच्या कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली, तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
आरोपींच्या वकिलाने हगवणे कुटुंबाचा बचावासाठी कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. वैष्णवीने नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची तिचे चॅट पकडले होते. त्या व्यक्तीने नकार दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केली आहे. १८ तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला, त्यामुळे ती कॅाल करत होती. तपास अधिकाऱ्याला त्या व्यक्तीचे नाव दिले आहे, असा खळबळजनक दावा हगवणे यांच्या वकिलांनी न्यायलयात केला आहे. यामुळे हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर गेले आहे.
हेही वाचा – आळंदीपासून हाकेच्या अंतरावर कत्तलखान्याचा प्रस्ताव!
काल २८ मे रोजी पुण्यातील कोर्टात महाराष्ट्रभर चर्चेत असलेले वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या प्रकरणात हगवणे यांच्या वकिलांनी न्यायालयात अनेक खळबजक दावे केले. वैष्णवीची प्रवृत्ती सुसाईट करण्याचीच होती. असे म्हणत ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्याने नकार दिला असेल, म्हणून ती नैराश्यात असेल म्हणून तिने आत्महत्या केली आहे, असा दावा केला आहे.
वैष्णवी यांनी एका तरुणाशी केलेले चॅटिंग पती शशांक यांना मिळाले होते. यावरून दोघांमध्ये वाद देखील झाला होता. ही बाब हगवणे यांनी वैष्णवीच्या यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवी यांचा मोबाईल काढून घेतला होता, असा युक्तिवाद वकिलाने न्यायालयात केला. वैष्णवी यांनी आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखरपुडा झाला आहे. या प्रकरणात पोलिस एकाच दिशेने तपास करत आहेत, असे देखील वकिल म्हणाले.