ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डॉ. अशोक शिलवंत यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिक्षण विश्व : गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीने सन्मान, सामाजिक बांधिलकीचे दर्शन

पिंपरी- चिंचवड | दिवंगत समाजसेवक, शिक्षणप्रेमी व अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे संस्थापक डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महानगरपालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. प्रणव लोटन शिंदे आणि कु. आरती नागप्पा खैतनार यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जागृत अपंग संघटना संचलित महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र, माण येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत आयु. मानव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षीय समारोपात त्यांनी डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांच्या समाजकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, “समाजाने देणारी वृत्ती जोपासली पाहिजे” असे मत व्यक्त केले. तसेच अपंगांनी अपंगांसाठी चालवलेली ही देशातील अनोखी संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा

“दोन्ही शिवसनेने एकत्र यावं”; अंबादास दानवेंच्या विधानावर एकनाथ शिंदेंचे सूचक उत्तर

यावेळी बोलताना त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत, कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतीही स्वप्ने साकार करता येतात, असे प्रतिपादन केले. डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित हा उपक्रम त्यांच्या विचारांना व कार्याला वाहिलेली खरी आदरांजली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास संस्थेच्या कार्याध्यक्ष आयु. नलिनी इनामदार, मुख्याध्यापक आयु. जगताप सर, सामाजिक कार्यकर्ते आयु. प्रताप गुरव, निवृत्त अधिकारी आयु. शरद जाधव, आयु. रवींद्र दुधेकर, आयु. वसंत साळवी, आयु. अनिल सूर्यवंशी तसेच श्रीमती कल्पना अशोक शिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. दिलीप कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. राजरत्न शिलवंत यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन अशोक सर्वांगीण विकास सोसायटी, पुणे यांच्या वतीने करण्यात आले.

“डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांनी समाजसेवा, शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना दिलेली आदरांजली आहे. आजच्या या उपक्रमातून आम्ही तोच सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

– डॉ. सुलक्षणा शिलवंत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button