Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

KYC नसेल तर गॅस नाही! सिलिंडर वितरणाचे नियम कडक, दोन सिलिंडरमधील अंतर आता 30 दिवस

Strict rules for gas cylinder distribution : केवायसी न केलेल्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. विशेष म्हणजे ज्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, अशा ग्राहकांना आता घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व ग्राहकांनी तातडीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गॅस कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन गॅस सिलेंडर घेण्यामधील कालावधी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी दोन सिलेंडरमधील अंतर 21 दिवसांचे होते, मात्र आता हे अंतर 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. म्हणजेच ग्राहकांना पुढील सिलेंडरची आता अधिकची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयामुळे सिलेंडर मिळवण्यासाठीच्या दिवसांमध्ये तब्बल 8 दिवसांची वाढ झाली आहे.

याशिवाय, अनेक ग्राहकांचे केवायसी अद्याप प्रलंबित असल्याने गॅस वितरकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. वितरकांकडे गॅसचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत घरगुती गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गॅसचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा –  ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे आता महिलांना कर्ज’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचाही परिणाम इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता वाढली आहे. या संघर्षामुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे.

इराण हा जगातील महत्वाचा तेल उत्पादक देश असल्यामुळे तेथील परिस्थितीचा थेट परिणाम इतर देशांवर देखील होताना दिसत आहे. भारतासारख्या देशांना कच्चे तेल आणि इंधनाचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी इंधनाचे दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्यास ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळण्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर गॅस कंपन्यांनी काही नियमांमध्ये बदल करत सिलेंडर वितरणाची प्रक्रिया अधिक कडक केली आहे. ग्राहकांनी आपले केवायसी तातडीने पूर्ण करणे, तसेच गॅसचा वापर जपून करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत घरगुती गॅस मिळवण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button